मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.05:- ऑक्टोंबर रोजी हिंगणघाट पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून बालाजी कंपनी जवळील कच्या रोडवर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील 112 पथकाचे कर्मचारी यांनी नाकेबंदी केली असता समोरून एक ईसम विना क्रमाकांच्या पाढऱ्या रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडी ने व दुसरा ईसम कथ्या रंगाच्या ज्युपीटर गाडी क्र. MH- 32- AW- 7706 क्रमाकांच्या गाडीने येताना दिसल्याने त्यांना दुरुनच पंचासमक्ष हात दाखवुन थांबण्याचा ईशारा दिला असता कथ्या रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडी चा चालकाने पोलीस व पंच दिसतास त्याने त्याचे ताब्यातील मोपेड गाडी गाडी मोक्यावर सोडुन पळुन गेला व विना क्रमांकाच पांढऱ्या रंगाची ज्युपीटर मोपेड गाडीचा चालक याने त्यांच्या तांब्यातील वाहन थांबविले असता, त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विओम देवराव क्षिरसागर वय 20 वर्ष, रा. संत कबीर वार्ड हिंगणघाट, असे सांगितले तसेच पसार झालेल्या मोपेड गाडीच्या चालकांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव बलवंत कुडमते रा. नांदगाव असे सांगितले वरून दोन्ही वाहनाची पाहणी केला असता आरोपी विओम क्षिरसागर यांचे ताब्यातील विना क्रमाकांच्या पाढऱ्या रंगाच्या ज्युपीटर मोपेड गाडीच्या पायदानावर 03 निळ्या पन्न्यामध्ये एकुण 90 एम.एल. च्या प्रिमीयम नं.1 कंपनीच्या देशी दारुनी भरुन असलेल्या एकुण 300 प्लॉस्टीकच्या शिश्या व पसार एसम बलवंत कुडमते ज्युपीटर मोपेड गाडीच्या गाडीच्या पायदानावर 03 निळ्या पन्न्यामध्ये एकुण 90 एम.एल. च्या प्रिमीयम नं.1 कंपनीच्या देशी दारुनी भरुन असलेल्या एकुण 300 प्लॉस्टीकच्या शिश्या असा एकुण 600 सिलबंद 90 एमएल च्या देशी दारूच्या शिश्या कि. 60 हजार रुपये व दोन्ही वाहनाची किंमत 1 लाख 40 हजार रुपये व स्मार्ट फोन किमंत 5 हजार रुपये असा एकुण 205,000 रूपयाचा माल विओम क्षीरसागर याचे ताब्यातून जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गभने ठाणेदार हिंगणघाट व एपिआय अनिल आळंदे याचे निर्देशा प्रमाणे 112 पथकाचे पोहवा प्रवीण बोधाने, स्वप्निल जीवने, संदीप उईके, भूषण भोयर यांनी केली.