मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.05:- संजय गांधी मराठी उच्च प्राथमिक शाळा हिंगणघाट येथे आनंददायी शनिवार या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध फुलांपासून पुष्पहार निर्मिती करण्यात आली तसेच हिंगणघाट पंचायत समिती येथील विषय तज्ञ कु. कविता घोडे कार्यक्रमाच्या समन्वयक यांच्या उपस्थितीत पुष्पहार निर्मिती स्पर्धा घेण्यात आली स्वतःच्या गुरुचा शोध घेऊन नवनिर्मिती साठी संधी उपलब्ध करून देण्याचे व्यासपीठ म्हणजे सहशालेय उपक्रम व त्यातून घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा आहे. याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले.
आनंददायी उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कऱ्यकामसाठी विद्यार्थ्यांनी भरभर प्रतिसाद दिला त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. बांदुरकर यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे संचालन सौ. दारुंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. अलोणे यांनी केले

