मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर दि. 7:- तालुक्यातील नंदुरी येथील ग्रामस्थांचे कित्येक दिवसांपासूनचे प्रलंबित असलेले पट्ट्याचे वाटप व चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची मोठ्या प्रमाणात हानी झाली व प्रशासनाने पंचनामे करून सुद्धा अजून पर्यंत नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही तसेच बऱ्याचशा लोकांना अजून पर्यंत पट्टे वाटप झालेले नाही करिता शासनाने दखल घेऊन लाभार्थ्यांना पट्टे वाटप करण्यात यावा याकरिता असंख्य ग्रामस्थांनी डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आज समुद्रपूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत वर्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित किशोर माथनेकर, राजीव खानकुरे, मनीष कांबळे, चारुदत्त आटे, अरुण दिवे, भारत गायधने तसेच नंदूरी गावातील महिला व पुरुष असंख्य लाभार्थी तहसील कार्यालय समुद्रपूर येथे निवेदन देता वेळी उपस्थित होते.