पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- माणुसकी सुरक्षा रक्षक सेना यांचा वतीने आपल्या मागण्याला घेऊन नागपूर येथील संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नागपूरचे कार्यक्षेत्र नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा असून चारही जिल्ह्यामध्ये मंडळाचे सुरक्षा रक्षक विविध आस्थापनामध्ये कार्यरत आहेत.
प्राप्त माहितीनुसार नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे सुरक्षा रक्षक उपलब्ध नाहीत. प्रतिज्ञा यादीतील उमेदवाराची यादी संपुष्टात आलेली आहे. मंडळाचे कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील विविध आस्थापनेकडून सुरक्षा रक्षकांची मागणी येत आहे. पण मंडळाकडे सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्यामुळे आस्थापनांना सुरक्षा रक्षक मंडळ पुरवू शकत नाही. ही खेदाची व संतापजनक बाब आहे.
शासन वर्षानुवर्षे सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवित नसल्यामुळे अशी पाळी येन म्हणून भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नागपूर यां सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबविण्याकरिता शासनाकडे परवानगी मागीतली होती. त्याव शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ हे नावापुरतेच राहिले आहे. असे म्हणणे वावगे होणार नाही.
माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेने सुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे. पण शासनाच्या उदासिन धोरणामुळे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळावर अवकळा आलेली असून मंडळ केव्हाही बंद होवू शकते. मंडळामध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांवर बेरोजगार होण्याची पाळी येऊ शकते. तसेच शासनावर सुद्धा नामुषकीची पाळी येऊ शकते.
मागणी क्र. २ : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (मिहान) नागपूरच्या मालकीच्या वॉटर ट्रिटमेंट प्लांटमधील ५० सुरक्षा रक्षकांना नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नागपूरमध्ये सरसकट समाविष्ट करून घ्यावे ही मागणी प्रलंबित असून मुख्यमंत्री कक्ष कार्यालय नागपूरच्या आदेशाचे पालन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी करित नाही असे पत्र व्यवहारांवरून कळून येते.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित (मिहान) लिमिटेड नागपूर ही नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नोंदणी क्र. एस.जी.बी./एन.जी.पी.७९/२०१२ असून विकास कंपनीमध्ये कार्यरत १७१ सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदणीकृत आहे. पण ५० सुरक्षा रक्षकांना सरसकट सामावून घेणारी मागणी प्रलंबित का ठेवण्यात येत आहे, ही बाब विचार करण्यालायक आहे. याही बाबात माणुसकी सुरक्षा रक्षक सेना सतत पाठपुरावा करिता आहे. पण हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यामध्ये विमानतळ विकास कंपनी नागपूरचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. असा संघटनेचा आरोप आहे. तरी याप्रकरणी योग्य ती कारवाई करून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यावी.
या प्रलंबित मागण्या सुरक्षा रक्षकांच्या बाबतीमध्ये अगदी ज्वलंत असून त्या मागण्या शासनाने व संबंधित विभागाने सोडविल्या पाहिजे. त्याकरिता पत्र व्यवहार झालेला आहे. परंतु या प्रलंबित मागणीवर शासनाने किंवा संबंधित विभागाने तोडगा काढलेला नाही. म्हणून माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेचे पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार आंदोलनात्मक भूमिका घेवून अशी सुचना केल्यानुसार दिनांक 03 ऑक्टोंबरला दुपारी 11.00 वाजता संविधान चौक येथे बेमुदत साखळी उपोषणाचा सुरू करण्यात आले आहे. यावेळी पोलिस विभागास आमरण उपोषणाची परवानगी मागीतली होती. परंतु ती परवानगी नाकारल्या गेली म्हणून माणुसकी सुरक्षा रक्षक सेनेचे पदाधिकारी व सुरक्षा रक्षकांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिलेला आहे.