अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वडसा दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, मनोरूग्ण, पुनर्वसन केंद्र जामगाव (को) भीसी तालुका चिमूर जि. चंद्रपुर वतीने हिंगणघाट शहरामध्ये दिव्यवंदना आधार फाउंडेशन ने मनोरुग्ण करीता 1 दिवसीय मोहीम राबविण्यात आली.
या मोहीम दरम्यान पोलिस स्टेशन हिंगणघाट परिसरात 1 महीला मनोरुग्ण अवस्थेत भेटली. यावेळी तिच्या नातेवाईक बाबत विचारना केली असता काहीही सांगत नसुन शहरात विचारना केली तर काहीही माहिती भेट ली ते नाही. सदर मनोरुग्ण हि रस्त्यावर भडकत असुन त्याच्या सुरक्षेच्या दुष्टीने दिव्यवंदना आधार फाउंडेशन ने पुनर्वसन केंद्र मध्ये कायम स्वरूपी जबाबदारी घेतली आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित बेघर, बेवारस, भिक्षेकरी, अनाथ, निराधार, मनोरुग्ण केंद्र जामगाव, भिसी येथे त्यांचे केंद्र बनले आहे. त्यांना येथे उपचार, निवारा खाण्यापिण्याची निशुल्क व्यवस्था, मनोरंजन कक्ष, समोपदेशन कक्ष, आरोग्य तपासणी कक्ष, औषधोपचार, सुरक्षा व्यवस्था इत्यादी सोयी उपलब्ध करून दिली आहे.
निवारा मधील गरजू लोकांना साधनांची सुविधा उपलब्ध करुन दिली असून त्यात ट्यूबलाइट, पंखे, वॉश बेसिन, स्वयंपाक गृह, वॉटर प्युरिफायर, सीसीटीव्ही कॅमेरा, रुग्णवाहिका, मनोरंजन साधने, प्रथमोपचार किट, टेलिव्हिजन, कॅरम बोर्ड, चेस, बॅडमिंटन इत्यादी सोई असुन दोन वेळा चहा, एक वेळचा नाश्ता जेवण हि सुविधा पुरविल्या जाते. निवाऱ्यामधील राहणाऱ्या लोकांना निशुल्क गरजेच्या वस्तू टूथपेस्ट, मंजन, साबण, अंतरवस्त्र, बिछायत, चादर, ब्लॅंकेट, तेल, कपडे, चप्पल इत्यादी गरजु लोकांना पुरवण्यात येत असतात.
या केंद्राला कुठल्या प्रकारचे शासकीय अनुदान नसतानाही दिव्यवंदना आधार फाउंडेशन पूर्ण महाराष्ट्र करिता महान कार्य करीत आहे. जामगाव को. भिसी येथे या लोकांच्या हक्काचे निवारा केंद्र बनले आहे. मानसिक आरोग्यबाबत असलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी मोठी जनजागृती मोहीम राबविण्यात येते आहे. विदर्भात कुठेही मनोरुग्ण आढळला तर शुभम ला फोन येतात.
मनोरुग्ण कितीही आक्रमक असो त्याला शांत करून सोबत नेण्याची कला आता शुभम ला चांगलीच अवगत झाली आहे. आजवर शुभमने ४०० हून अधिक मनोरुग्णांना नागपूर येथे उपचारा करीता पाठवले आहे. अनेकांना बरे करून त्यांच्या घरी सुद्धा पाठवले आहे. दिव्यवंदना आधार फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर यांनी रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, अनाथ, मनोरुग्ण लोकांना हक्काचे घर दिले आहे. त्याच्या या कार्याची दखल समाजातील समाजसेवकांनी तसेच युवकांनी घेऊन या कार्यासाठी मदत करण्याचे आव्हानही करण्यात आले आहे.
हिंगणघाट येथील मोहिम दरम्यान मनोज गभने पोलीस निरीक्षक हिंगणघाट पोलीस स्टेशन व पोलीस स्टेशन ची संपूर्ण टिम व दिव्यवंदना आधार फाउंडेशन ची टिम मधील दिव्य गलगले, प्राची गजभिये, शैलेष शंभरकर, सोहन देशमूख उपस्थित होते.