*अतिशय संघर्षातून जीवन जगणारी नारीशक्ती कविता बोरकर..,यांचा साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यां संगीता ठलाल यांनी केला सत्कार*
*मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.*
*कुरखेडा : -* कविता बोरकर वयाच्या तेराव्या वर्षाची असताना त्यांच्या आईबाबाचे निधन झाले. तेवढ्या कठीण परिस्थितीत पाटच्या दोन्ही लहान बहीण, भावाची आईबाबा बनून त्यांचा सांभाळ केला. एखादा चित्रपट तयार होईल अशी त्यांची भयानक कहाणी आहे. संघर्षाने भरलेले जीवन असतांनाही कशाप्रकारे जगले पाहिजे या समाजाला दाखवून देणारी धानोरा तालुक्यात येणाऱ्या मु. मुस्का येतील रहिवासी महान नारीशक्ती कविता भाऊराव बोरकर आहेत. आजपर्यंत या प्रकारचे संघर्षमय जीवन कोणाच्याच वाट्याला आले नाही एवढा संघर्ष कविता बोरकर यांना करावा लागला आणि आजही करत आहेत. यांची हीच हिंंमत बघून नवरात्र उत्सव निमित्याने खऱ्या नारीशक्तीचा सन्मान व्हावा या उद्देशाने मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी त्यांच्या स्वगृही जाऊन पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ, साडीचोळी, काही पुस्तके देऊन त्यांचा सत्कार केला, त्यांची विचारपूस केली व आपली संपूर्ण संघर्षमय जीवन कहाणी लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यत पोहोचविण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन म्हणून त्यांना शब्द दिला. त्यावेळी महान नारीशक्ती कविता बोरकर यांनी सुध्दा बोलताना म्हटले की, आम्ही तिघेही बहीण, भाऊ लहानपणातच अनाथ झालो,खुप कठीण दिवस काढले काही दिवसांनी थोडे दिवस सुखाचे आले तेही नियतीला बघून झाले नाही. माझ्या पतीचे दोन वर्ष झाले कर्करोगाने निधन झाले. माझे संपूर्ण जीवनच संघर्षमय आहे तरीही मी जगण्याचा प्रयत्न करत आहे. आज संगीता ठलाल माझ्या घरी येऊन माझी भेट घेतली, माझी आपुलकीने विचारपूस केली जीवनात पहिल्यांदाच माझे कोणीतरी आहेत असे मला वाटले म्हणून संगीता ठलाल यांना अश्रूं भरलेल्या डोळ्यांनी आशीर्वाद दिला त्या भावनीक प्रसंगी कविता बोरकर यांचा मुलगा होता सोबतच संतोष ठलाल आणि महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक प्रकाश देसाई हे, प्रामुख्याने उपस्थित होते.