प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- खनिज विकास निधी अंतर्गत बोकडडोह (ग्राम पंचायत ओवाळा) येथे 1.50 कोटीचे बोकडडोह सार्वजनिक अध्ययन केंद्र वाचणालयाच्या सभागृह बांधकाम भुमीपूजन सोहळा खासदार डॉ. नामदेव किरसाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
शिवराय ते भीमराय प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम.
यावेळी सामाजिक प्रबोधन व्हावे म्हणून प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर व गायिका कडूबाई खरात यांच्या शिवराय ते भीमराय प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती भिक्षु ज्ञानजोती महाथेरो संघरामगिरी रामदेगी, खासदार डॉ. नामदेव किरसाण, माजी राज्य मंत्री तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर, जेष्ठ समाज सेवक, मारोतराम कांबळे अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष प्रफुल खापर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे, अनमोल शेंडे, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद बोरकर, युवक काँग्रेस अध्यक्ष चिमूर विधानसभा रोशन ढोक, सरपंच ग्राम पंचायत ओवाळा निशा सोनटक्के, डॉ. टेंबूरकर, प्रा. वानखेडे, प्रकाश शेन्डे, बबिता रामटेके, लालाजी मेश्राम, वसंत मेश्राम व सर्व बौध्द उपासक व उपासिका उपस्थित होते.