अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ८ ऑक्टोंबर:- सावनेर आगारात दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढतीवर आहे. पण प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार आगारातील बसेसची संख्या कमी असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तासंतास प्रवाशांना, विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे व समोर सणासुदीचे दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी पुन्हा वाढू शकते.
प्रवाशांना एसटी प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी योग्य नियोजन व बसेसची संख्या वाढविण्याच्या दिशेने तात्काळ पाऊल उचलावे या आशियाचे निवेदन आगार व्यवस्थापक तागडे सावनेर यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. पोद्दार यांना देण्यात आले.
यावेळी नगरसेवक तुषार उमाटे, अभिषेक सिंग गहरवाल, नरेंद्र ठाकूर, प्रणय तीबोले, विद्यार्थी व प्रवासी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.