संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने बिरसामुंडा चौक राजुरा येथील करण्यात आलेल्या २० लक्ष रुपये मंजूर निधीच्या क्रांतिवीर शहीद वीर बिरसामुंडा चौकाचे सौंदर्यीकरण कामाचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भुमिपुजन पार पडले.
आदिवासी समाज बांधवांच्या मागणीची दखल घेऊन चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ९ आँगस्ट हा दिवस आदिवासी दिवस म्हणून राज्य सरकारने शासकीय स्तरावर राज्यात सर्वत्र साजरा करावा अशी मागणी केल्याबद्दल सकल आदिवासी समाज बांधव तालुका राजुराच्या वतीने आ. सुभाष धोटे यांचे आभार मानण्यात आले. यावेळी जय सेवा, सुभाषभाऊ आगे बढो च्या जयघोषाने परिसर निनादून गेला. सकल आदिवासी समाज आ. सुभाष धोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहुन त्यांना पून्हा निवडून आणण्यासाठी संकल्पबध्द असल्याचे समाज बांधवांनी निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, अमृत आत्राम, श्यामराव मेश्राम, माजी नायब तहसीलदार रमेश कुरसंगे, तुलाराम गेडाम, संतोष कुडमेथे, कनिष्ठ अभियंता साबळे, माजी नगरसेवक आनंद दासरी, विलास तुमाने, सेवादल काँ. तालुकाध्यक्ष दिनकर कर्नेवार, ओबीसी काँग्रेसचे धनराज चिंचोलकर, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, माजी सरपंच भास्कर चौधरी, पंढरी चन्ने, प्रणय लांडे, अनंता ताजणे, कवडू सोयाम, अभिषेक परचाके, किशोर उईके, नितीन सिडाम, शालीक पेंदोर, लक्ष्मण कुमरे, आकाश गेडाम, प्रकाश मरस्कोले, देवानंद लांजेवार, लक्ष्मण कुमरे, सुजाता मेश्राम, बबन मडावी, सुजाता मेश्राम, मंजुषा कोडापे, वर्षा कोडापे, स्वाती टेकाम, सुरेखा कोडापे, जोती कोडापे, कल्पना टेकाम, सर्वेचना आत्राम, शारदा टेकाम, छबुबाई सोयाम, मिराबाई टेकाम, विमलताई कोडापे, पार्वता कोडापे, मंदा कोडापे, माया टेकाम, ललिता टेकाम यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धिरज मेश्राम यांनी केले. संचालन योगेश कोडापे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आलाम यांनी केले. कार्यक्रमाला आदिवासी बांधव, भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.