*सामाजिक कार्यकर्ते सागर मुलकला यांनी केली जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा – तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील येणारे कोत्तागुडम पाण्याची टाकी जवळ रस्त्यावर लांबडपल्ली गावाचे दोन युवक सिरोंचा येथून दुचाकीने स्वागावी जात असताना नियंत्रण चुकून खड्डयात पडल्याने त्यांचा अपघात झाला आहे,
ही माहिती मूलकला फाऊंडेशनला मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी युवकांना सिरोंचा येतील ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
त्यावेळी मूलकला फाऊंडेशनचे प्रमूख – सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ मूलकला,आणि त्यांचे चमू गणेश संड्रा, धर्मांना रेकाम, सलमान शेख आदी मुलकला फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित राहून रुग्णांना दवाखान्यात भर्ती करण्यात आले आहे.