सत्ताधाऱ्यांकडून महिलांचा अपमान, स्त्री सुरक्षेची पायमल्ली; निषेधार्थ राष्ट्रवादी महिलां कडून तीन तोंड्या रावणाचे दहन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख यांच्या मार्गदर्शनात तीन तोंडी रावणाचे दहन करण्यात आले.
सत्ताधारी पक्षाने सातत्याने महिलांचा अपमान केला असून, स्त्री सुरक्षेच्या बाबतीत केलेल्या वागणुकीने त्यांच्या धोरणांचा निषेध केला गेला आहे. महिलांच्या सुरक्षेची धज्जा उडवली गेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचा अपमान आणि अत्याचार होत असताना, सत्ताधाऱ्यांच्या तीन तोंडी रावणासारख्या असलेल्या व्यवस्थेने डोळे उघडलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या महिलांनी तीन तोंड्या रावणाचे प्रतिकात्मक दहन करून सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. हे दहन म्हणजेच सत्ताधाऱ्यांच्या महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि अपमानाविरुद्धचा कडक निषेध आहे. समाजातील प्रत्येक स्त्रीच्या अधिकारांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलण्याची मागणी करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर कार्याध्यक्षा सिमां तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस सविता गिरी, नालंदा राउत, ओबीसी शहर अध्यक्ष आचल वकील आदी पदाधिकारी उपस्थित होते.