संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा13:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटगाव केंद्र, अहेरी तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राजुरा अंतर्गत डॉ. सुचिता धांडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुसंवर्धन विभाग राजुरा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.नरसिंग तेलंगे यांच्या नेतृत्वात जागतिक अंडी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबन देवतळे, प्रतिष्ठित नागरिक बोटगाव हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.नरसिंग तेलंगे, पशुधन विकास अधिकारी गट अ, विचारपीठावर माजी सरपंच वांढरे पाटील, लोहे पाटील, पिपरे पाटील, श्रीमती बोंडे, अंगणवाडी सेविका सुनीता धनवलकर आदींची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमांमध्ये डॉ.नरसिंग यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जागतिक अंडी दिनानिमित्त आहारामध्ये अंड्याचे अनन्य साधारण महत्व आहे. अंडे हे पूर्ण आहार आहे. विशेषता लहान मुले आणि वृद्ध व्यक्तीच्या आहारात दररोज उकडलेली अंडी आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल आपल्याला मिळतील असे प्रतिपादन त्यांनी केले. शाळेतील सर्व मुलांना उकडलेली अंडी वितरित करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश कोडापे , मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटगाव यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी कुमारी ईशानी वडस्कर हिने केले.