विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध समितीच्या नोडल अधिका-यांची बैठक.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.11:- येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा निवडणूक आयोगाकडून होणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावरील विविध समित्यांच्या नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यानी नेमुण दिलेल्या कामाचे विधानसभा निवडणूक निर्णय अधिका-यांशी समन्वय साधून नियोजन करुन आराखडा तयार करावा. अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विविध समितीच्या नोडल अधिकाऱ्याच्या आढावा बैठकीत केल्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनील गावीत, विधानसभा निवडणूकीकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
नोडल अधिकाऱ्यानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी समन्वय साधून आवश्यक त्याप्रमाणात कर्मचारी उपलब्ध करुन घ्यावे. अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याकरीता प्रशिक्षकासह प्रशिक्षणाची तारीख, वेळ व ठिकाणाचे नियोजन करावे. वाहतुक व्यवस्थेसाठी खाजगी बसेस, शाळेच्या व्हॅन बस, उद्योग कंपनीच्या बसेसचा वापर करण्यासाठी वाहन उपलब्ध करुन घ्यावे यासाठी छोट्या वाहनांना प्राधान्य दयावे.
ज्या मतदान केंद्रावर लोकसभा निवडणूकीत 20 टक्के पेक्षा कमी मतदान झाले त्या परिसरात मतदान जनजागृती करावी. विधान निवडणूकीचा कालावधी दिवाळी मध्ये येत असल्याने शाळा व महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्या घोषित करण्यात येतात यासाठी शिक्षणाधिका-यांनी शाळेच्या मुख्याद्यापकांना व संस्था प्रमुखाना सुचना देऊन शिक्षक व कर्मचाऱ्यानी दिर्घ रजेचे नियोजन करु नये असे सुचित करावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
लोकसभा निवडणूकी दरम्यान असलेल्या मतदान केंद्राच्या संख्येत येत्या विधानसभा निवडणूकी साठी 42 मतदान केंद्रात वाढ झाली असल्याने त्या संबंधीत मतदान केंद्र परीसरात मतदारांना त्यांचे पुर्वीचे मतदान केंद्र कोणत्या मतदान केंद्रावर स्थानांतर झाले असल्याची जनजागृती करणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्याची त्यांच्या मुख्यालय असलेल्याच मतदार संघात निवडणूकीच्या कामकाजासाठी नियुक्ती करावी. निवडणुकीसाठी नियुक्त असलेले कर्मचारी मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी टपाल मतदान पत्रिकेचे नियोजन वेळेपुर्वी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्यात.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मणुष्यबळ व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणुक साहित्य व्यवस्थापन, सायबर सुरक्षा व माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, मतदार जनजागृती, कायदा व सुरक्षा, मतदान यंत्र व्यवस्थापन, निवडणूक खर्च, आदर्श आचार संहिता, टपाल मतपत्रिका, गृह मतदान, माध्यम सनियंत्रण समिती व मतदार यादी समिती आदी समित्यांचा आढावा घेतला.