श्री संत नगाजी महाराज यांचे नांव दिल्याने भाजपा नाभिक समाज आघाडीने व्यक्त केले आभार.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.१४ ऑक्टो:- विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांचे विशेष प्रयत्नामुळे हिंगणघाट शहरातील औद्योगीक प्रशिक्षण संस्थेला शासनाने “श्री संत नगाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे नाव दिले.
उपरोक्त”नामांतर सोहळा” विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार योगेश शिंदे, संस्था व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम देशपांडे, प्राचार्य सुजय रहाटे यांचे प्रमुख उपस्थितीत विजयादशमीचे मुहूर्तावर संपन्न झाला.
श्री संत नगाजी महाराज हे पंचक्रोशीतील नाभिक समाजबांधवांचे लोकमान्य दैवत आहे. या महान विभूतीचे नाव हिंगणघाट येथील शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला दिल्याने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नाभिक बांधवांसह सर्व सामान्य जनतेने आ. कुणावार यांचे आभार व्यक्त केले आहे.
आ. कुणावार यांचे विशेष प्रयत्नामुळे येथील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेला श्री संत नगाजी महाराज यांचे नांव देण्यात आल्यामुळे भाजपा नाभिक समाज आघाडीचे वतीने आभार व्यक्त करीत शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेस भेट दिली.
यावेळी भाजपा नाभिक समाज तालुका अध्यक्ष विलास अंबरवेले, शहर अध्यक्ष बंडू लाखे, सुर्यकांत अतकर, महेश हरबुडे, प्रमोद कडू, अनिल अतकर, राजू चौधरी, प्रमोद साखरकर, राजू माडेवार, अनिल चाफले, रूपेश सौदरकर इत्यादी उपस्थित होते.