राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- विजयादशमी हा सण 67 वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव साजरा करत असतात.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु धर्माचा त्याग करत 14आक्टोंबर 1956 रोजी नागपुर येथे पाच लक्ष अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला व तेव्हा पासुन सर्व आंबेडकरी जनता ही धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजया दशमी शहरात पासुन ते गाव खेड्या पर्यंत प्रत्येक ठिकाणी साजरा केल्या जातो.
जिवती तालुक्यातील अगदी लहान असलेले नौकेवाडा ह्या गावात दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी चा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस विभागाचे कर्मचारी सचिन तोडसम आणी क्रुष्णा चव्हाण उपस्थित होते. तर कार्यक्रमाची सुरुवात रघुपती मुनेश्वर यांनी बुद्ध वंदना पासुन केली व मान्यवरांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांचे विचार आपल्या भाषणाच्या माध्यमातुन मांडले.
यावेळी या कार्यक्रमाला गावातील नागरीक कोंडिबा सावंत, रमेश सावंत तिरुपती दुधाणे सचिन खांडेकर प्रशांत खांडेकर करणं खांडेकर व विनोद दादा खांडेकर इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आणी कपील जावळे यांनी सर्व पाहुणे मंडळींचे आभार प्रदर्शनातुन सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम पार पाडला.