उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- शहरात मोठ्या प्रमाणात मुली व महिलेवर अत्याचाराच्या घटना वाढत आहे. त्यामुळे महीलान मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात सांगली शहरातील संजयनगर मध्ये दोन महिन्यापूर्वी आँगस्ट महिन्यात चिंतामणी नगर झोपडपट्टीत नराधम संजय माने याने लहान मुलीवर अत्याचार केला होता आता परत एक अत्याचाराचा घटनेने सांगली शहर हादरले आहे.
8 ऑक्टोंबर रोजी संजयनगर झोपडपट्टी पत्राचाळ येथे ईश्वर उर्फ राहुल कांबळे याने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आहे़. सदर दोन्ही घटना विक्रुत माणुसीकीला कांळीबा फासणारे आहेत. त्यामुळे संजयनगर मध्ये मुली व महिला यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी दोन्ही आरोपीला कठोर शिक्षा होणेचे गरजेचे आहे. त्यासाठी आज सजय नगर नागरिकांच्या वतीने आरोपीचे वकीलपत्र कोणी घेऊ नये यासाठी सांगली बार असोसिएशन चे अध्यक्ष अँड. किरण रजपुत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांचाशी सकारात्माक चर्चा झाली. त्यांनी आमच्या मागणीला सहमती दर्शविली.
यावेळी नागरिक दिपक माने, देवानंद शिखरे, विलास सर्जे, रौफभाई भालदार, ईर्शाद पखाली, वासिम बलबंड, कादीर मुजावर, वाशीद पठाण, आंनदा ऐवळे, आसिफ मुजावर, मोहसीन बेळगी, ईरफान मुलाणी, गुलाब जमादार, शशीकांत कांबळे आदी नगरिक मोठया संख्येने उपस्थित होते.