राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगराचा विजयादशमी उत्सव साजरा.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- बांगलादेश मधील सत्ता परिवर्तना नंतर तेथील दुर्बल घटकावर पाशवी अत्त्याचार करण्यात आले. ह्या प्रवृत्तीचे वेळीच निर्मूलन करावयाचे असल्यास व देशाचे भविष्य उज्वल करावयाचे असेल तर कुटुंब व्यवस्था,शाळा, मंदिर व संघ हे चार केंद्र मजबूत व्हायला पाहिजे व हे चार केंद्र जो पर्यंत मजबूत होणार नाही तों पर्यंत समाज टिकणार नाही, सुस्थितीत राहणार नाही यासाठी हे चार केंद्र मजबूत करण्याचे आवाहन अ. भा. संस्कृत भारतीचे संपर्क प्रमुख श्री श्रीशजी देवपूजारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट शाखेच्या विजयादशमी महोत्सवात बोलतांना केले.
रविवार, दि. 13 ऑक्टोबरला येथील माधव ज्ञानपीठच्या सभागृहात विजया दशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुजराथी समाजाचे अध्यक्ष एड हरिराजजी पटेल उपस्थित होते. यावेळी श्रीश देवपुजारी यांनी भारतीय व पाश्चिमात्य विचारधारे बाबत फरक स्पष्ट करून सांगितला. ते पुढे म्हणाले,अमेरिका व अन्य पाश्चात्य देश हे चार्वाकांची उपभोगवादी प्रवृत्ती जपणारे देश आहेत. पूर्वजन्म, पाप पुण्य परोपकार यांचा विचार नाही.लिव इन रिलेशनशिप, वृद्धाश्रमात आई – बापाला घालण्याचे विचार, वंश, परंपरा, संप्रदाय यावर विश्वास नसणारे या सनातनं देशात आपले विचार घालून या देशात विदेशी व काही त्यांना मदत करणाऱ्या या देशातील प्रवृत्ती प्रयत्नशील आहेत. म्हणूनच या देशातील मातृ, पितृ, व आचार्य या तिन्ही घटकानी अधिक जागृत राहण्याची गरज आहे.
हा देश आतून पोखरल्या जात असतांना येथील शिक्षकानी या बाबत जागरूक राहून विध्यार्थ्यांशी सतत संवाद साधला पाहिजे तरच आपली सनातनं संस्कृती टिकून राहील, सनातनं चिंतनाच्या आधारावर जीवन जगतात अशा संस्कारीत लोकांचे संगठन करणे अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आपण पर्यावरण पूजक असून वेदां मध्ये प्रकृतीची पूजा सांगितलेली असून आज त्या विरुद्ध वागून आपण पर्यावरणाचे मोठे संकट निर्माण केले आहे. यावरही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
संस्कृत शिवाय संस्कार संभव नाही. संस्कारा शिवाय संस्कृती नाही. म्हणून सुसंस्कारीत बौद्धिक व अध्यात्मिक पिढी निर्माण होण्यासाठी आपली संस्कृती जपण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी प्रमुख अतिथी एड हरिराजजी जीवराजजी पटेल यांनी विचारांचे आदान प्रदान झाल्या शिवाय राष्ट्राची प्रगती होणार नाही असे प्रतिपादन केले.
आज काल पासून पाऊसाची रीप रीप सुरु असल्याने एनवेळी गोकुळधाम मैदान ऐवजी भारत विद्यालयातील माधव ज्ञानपीठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगर संघचालक विनोद नांदूरकर यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. वैयक्तिक गीत निर्मल इसाळ यांनी सादर केले. दिनेश मुडे यांनी सामूहिक गीत म्हटले. या जाहीर कार्यक्रमापूर्वी शहरातील प्रमुख मार्गाने घोषपथकासह पथसंचालन केले. कार्यक्रमाला शहरा तील स्त्री पुरुषाची भरगच्च उपस्थिती होती.