पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर.
यातील नमुद यु-ट्युब वरील (बंटी बबली) जोडपी यांनी मानधन मायक्रो फायनान्स या नावाची खोटी संस्था, मुकुंदनगर, पुणे येथे चालु करुन कर्ज देण्याचे बाहण्याने फिर्यादी व इतर अनेक गरजु लोकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी व खात्री देवुन त्यांचे ऑफिस मध्ये बोलावुन १५ दिवसांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचे बहाण्याने त्यांचेकडुन कर्ज मंजुरीसाठी कागदपत्रे व आगाऊ रक्कम घेवुन त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजुर न करता, त्यांचेकडील अंदाजे रक्कम १२,३०,०००/- रुपये घेवुन नागरीकांची फसवणुक केली असल्याने स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २०३ / २०२२ भा.द.वि.क. ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
स्वारगेट पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, अशोक येवले, पोलीस अंमलदार फिरोज शेख, शिवदत्त गायकवाड व महीला पोलीस अंमलदार, होळकर यांची टीम तयार करून, गुजरात येथील सुरत याठिकाणी जावुन स्थानीक पोलीसांची मदत घेवुन यु-टुब चॅनेल वरील अभिनेत्री १) दिपाली जितेंद्र पौनिकर वय – ३२ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०२, बी विंग, सुमन सार्थक सोसायटी, सिंगनपुर, सुरत, गुजरात २) हेमराज जिवनलाल
भावसार, रा. सदर यांना ताब्यात घेवून अटक करणेत आली आहे. सदरची फसवणुक ही त्यांनी कोणत्या हेतूने केलेली आहे? तसेच त्यांची स्वतःची फसवणुक करणारी टोळी आहे का? फसवणुक केलेली रक्कम कोठे ठेवली आहे अगर त्या रक्कमेतून काही खरेदी केली आहे का? याबाबत तपास करणे असलेने त्यांना अटक मुदतीत मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर, पुणे संचि न्यायालयात हजर ठेवले असता मा. न्यायालयाने त्याची दि. २५/०९/२०२२ रोजीपर्यंत पोलीस कोठडीची रिमांड दिली असून, पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक, अशोक येवले हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री. संजय डहाळे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा.श्री.सागर पाटील, पोलीस उपआयुक्त, परि २. पुणे शहर, मा. श्रीमती सुषमा चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर श्री अशोक इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अशोक येवले, पोलीस उप-निरीक्षक, पोलीस अंमलदारतारु, शेख, गायकवाड, धुले, गोडसे व महीला पोलीस अंमलदार, होळकर यांनी केली आहे.