अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील साई मंदिरात श्री. साईबाबा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. 12 ऑक्टोंबरला विजयादशमी हा श्री. साईबाबांचा समाधी दिवस असल्यामुळे सकाळी पासून मंदिरात श्री चा अभिषेक, हवन, पूजा व आरती करण्यात आली. ढोल, ताशे, घोडे, दिंडी फटाक्यांची आतिषबाजी करीत श्रीची पालखी काढण्यात आली.
यावेळी साई बाबाची ही पालखी सावनेर शहरातील बस स्टॅन्ड, गांधी चौक, गडकरी चौक, बाजार चौक, होळी चौक पर्यंत प्रदक्षिणा घालून परत श्री.साईबाबा मंदिरा मध्ये आली. यावेळी श्रीच्या पालखीसोबत शेकडो भक्तांचा समावेश होता. यावेळी श्री.संत भारती महाराज सांप्रदायिक हरिपाठ भजन मंडळ म्हसेपठार यांच्या दिंडीने भक्तांचा उत्साह वाढविला.
याच प्रमाणे प्रत्येक दिवशी श्रीची आरती, साई दर्शन, पूजा अर्चना, भजन व अल्पोपहारचा कार्यक्रम पार पडला. 13 ऑक्टोबरला सकाळी 8.00 वाजता पूजा व आरती करण्यात आली. रात्री 8.00 ते 10.00 वाजेपर्यंत आर्ट ऑफ लिविंग परिवारांतर्फे भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
14 ऑक्टोंबर ला दुपारी 3.00 ते 6.00 वाजता श्री साईबाबा महिला भजन मंडळ सावनेरच्या वतीने भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 15 ऑक्टोबरला दुपारी 3.00 ते 6.00 वाजेपर्यंत श्री विश्वकर्मा महिला भजन मंडळ सावनेरच्या वतीने भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
16 ऑक्टोंबरला दुपारी 3.00 ते 6.00 पर्यंत ह भ प श्री. विलास महाराज बनाईत (आळंदीकर) यांचे गोपाल काल्याचे किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सायंकाळी 7.00 वाजता श्रीच्या भव्य दिव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व साई मंदिर मित्र परिवारांनी परिश्रम घेतले.