विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध दारू विक्रीच्या उधाणामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, दिंडवी गावातील महिलांनी दारू बंदीची आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात खुलेआम दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. महिलांच्या मते, त्यांच्या संसाराची घडी विस्कटली असून, पतींचे व्यसन वाढल्याने कुटुंबातील महिलांना एकाकीपणाचा सामना करावा लागत आहे. काही महिला विधवा होण्याच्या मार्गावर आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
दिंडवी गावातील महिलांनी या अवैध धंद्यांविरोधात एकजूट दाखवत प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला आहे. “दारू विक्रीमुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत,” असे आक्रोश करत त्यांनी गावात दारू विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. यासोबतच महिलांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला जागरूक करण्याचे काम हाती घेतले आहे. “आम्हाला आपले पती, मुलं या व्यसनातून बाहेर काढायची आहेत, त्यामुळे हा लढा आम्ही थांबवणार नाही,” असे महिलांनी ठामपणे सांगितले आहे.
दारूमुळे वाढती गुन्हेगारी आणि कुटुंबातील तणाव: दारूमुळे गावातील वातावरण बिघडले असून, अनेक ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत. महिलांच्या म्हणण्यानुसार, घरातील पुरुष मंडळी व्यसनाच्या आहारी गेल्याने कुटुंबातील आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यामुळे कुटुंबात रोज वादविवाद होत आहेत आणि मुलांचे शिक्षण, भवितव्य धोक्यात आले आहे. तरुणाई या व्यसनाच्या विळख्यात अडकली असून, कुटुंबांमध्ये तणावाची परिस्थिती वाढत चालली आहे. दारू विक्रीमुळे गावात गुन्हेगारी आणि हिंसक घटना वाढल्याचेही महिलांनी निदर्शनास आणून दिले आहे.
प्रशासनाकडून ठोस कारवाईची मागणी: दारूविरोधी मोहिमेत महिलांनी गावातील पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दारू विक्री सर्वत्र सुरू आहे, पण पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. महिलांनी त्वरित कारवाईची मागणी करत, जर प्रशासनाने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निवेदन देऊन कारवाही ची मागणी करू