प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनी उद्घाटन पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने यांची उपस्थिती होती.
यावेळी अनुराग जैन यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करुन उपस्थित स्पर्धा परिक्षा अभ्यिासिकेतील विद्यार्थ्यांना अभ्यासातील बारकावे समजुन सांगुन अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितल्या.
सदर ग्रंथ प्रदर्शनी दोन दिवस सुरु राहणार असून या ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे नितीने सोनाने यांनी केले आहे.
तत्पुवी मान्यवरांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला हारअर्पण आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला प्रशांत लुटे, नयन कांबळे, प्रणाली मंडलीक व अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.