उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली. येथे पोलिस महिलेने पहिले लग्न लपवून ठेवत चक्क दुसरे लग्न करीत पतीची फसवणूक केल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वंदना महेश कांबळे वय 39, रा. इनाम धामणी, ता. मिरज या महिला विरोधात सांगली ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिच्या विरोधात पती महेश लक्ष्मण कांबळे वय 36 वर्ष, रा. आष्टा यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वंदना ही सांगली पोलिस विभागात कार्यरत आहे. वंदना कांबळे सह जनाबाई चंद्राप्पा कांबळे वय 60 वर्ष, राजशेखर चंद्राप्पा कांबळे वय 42 वर्ष, उषा शंकर माळी वय 40 वर्ष, सर्व रा. इनाम धामणी यांच्यावरही तरुणाची फसवून केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरीचे काम करतात. त्यांचे लग्न वंदना बरोबर 22 जून 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर एका आठवडात म्हणजे 30 जून 2022 रोजी ती पतीला काही न सांगता आपल्या माहेरी इनाम धामणीला निघून गेली. त्यानंतर पती महेश यांचे मामा सुहास पठाणे व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन महेश हे वैवाहिक संबंध ठेवण्यास पात्र नाहीत अशी तक्रार केली.
मी नांदण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. महेश व त्यांच्या कुटुंबाने माझी फसवणूक केली, त्याबद्दल 9 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली. पैसे न दिल्यास खटल्यात अडकविण्याची धमकी दिली. यादरम्यान, वंदना, जनाबाई, राजशेखर व उषा यांनी महेशच्या घरी माणसे पाठवून दिली. महेशच्या कुटुंबातील माणसांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.
दरम्यान, महेश यांनी न्यायालयात तक्रार केली की, वंदना हिच्या आरोपांमुळे आपल्या लौकिकास बाधा पोहोचली आहे. वंदना विषयी चौकशी केली असता तिचा पहिला विवाह सांगलीतील संजय राजाराम शिंदे रा. वखारभाग यांच्याशी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तिने आपली फसवणूक केली आहे. पोलिसांनी वंदना व अन्य तिघा संशयितां विरोधात गुन्हे दाखल केले.