पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील रमाई नगर कपिल नगर परिसरात असलेल्या ओयो होटेल पैराडाइस स्टे इन येथे आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करून ग्राहकांना पुरवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारावर पोलिसांनी ओयो होटेल पैराडाइस स्टे इन येथे एक बनावटी ग्राहक पाठवून याची खात्री केली. खात्री झाल्या नंतर पोलिसांनी छापा टाकला. यात दोन तरुणींची सुटका करण्यात आली. आरोपी यशराज राजेंद्र चोकसे वय 29 वर्ष, रा. मानेवाड़ा रोड, बेसा नागपूर शहर याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरी महिला आरोपी पूजा प्रीतम दहिकर वय 34 वर्ष, रा. इन्दोरा नागपूर ही प्रसार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस यांना गुप्त माहिती मिळाली होती की, कपिल नगर पोलिस ठाणे हद्दीत ओयो होटेल पैराडाइस स्टे इन मध्ये तरुणी कडून आरोपी यशराज राजेंद्र चोकसे व पूजा प्रीतम दहिकर हे दोघे देहव्यापार करून घेत होते. गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा वतीने छापा टाकून 2 पीडित महिलेची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनी पोलिस ठाणे कपिलनगर नागपुर येथे कलम 143, 3 (5) भा. न्या. सं. सहकलम 4, 5, 7 (अ) पिटा एक्ट भारतीय न्याय संहिता अनैतिक मानवी व्यापार अधिनियम 1956 अन्वये कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला: 1 मोबाईल किंमत अंदाजे 15,000 रुपये, कारवाई करीता वापरलेले नगदी 2000 हजार रुपये हिशोबाचे रजिस्टर किंमत 400 रुपये, पीड़ीते कडुन 2500 रुपये, कंडोम किंमत 60 रुपये असा एकूण 19,960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालसह पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे कपिलनगर नागपूर शहर यांचे ताब्यात देण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस करत आहे.