पंकेश जाधव . पुणे जिल्हा प्रतिनिधी
फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर.
फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी दिनांक २१/०२/२०२२ रोजी फरासखाना पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, गणेश दळवी, संदीप कांबळे, समीर माळवदकर, मोहन दळवी, राकेश क्षीरसागर, प्रविण पासलकर असे पोलीस स्टेशन हदीत गस्त करत असताना पोलीस अमलदार समीर माळवदकर, संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारकरवी माहीती मिळाली की, काही दिवसापूर्वी कराया पेठ, पुणे येथे चाँद सय्यद, सोहेल सय्यद व त्यांच्या साथीदारांनी घरफोडी केली असुन ते कोंबडी पुल मंगळवार पेठ, पुणे येथे थांबले आहेत अशी माहीती मिळाल्याने सदरची माहीती पोलीस अंमलदार समीर माळवदकर व संदीप कांबळे यांनी तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे यांना सांगितल्याने त्यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री शब्बीर सय्यद यांना कळविल्याने त्यांनी मार्गदर्शन करून पुढील कायदेशिर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्याने सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह जाऊन बातमीप्रमाणे दोन इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारले असता त्यांची नावे चाँद बाबु सय्यद, वय २० वर्षे, रा.खडकी, पुणे व सोहेल सलीम सय्यद वय १९ वर्षे रा-विश्रांतवाडी, पुणे असल्याचे सांगुन दिनांक ०२/०९/२०२२ रोजी त्यांनी व त्यांचा साथीदार रोहीत लंके व त्याचा साथीदार यांनी कसबा पेठ, पुणे येथे घरफोडी केली असल्याचे सांगितले असता सदरबाबत फरासखाना पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेख पडताळणी करुन पाहता सदर बाबत गुन्हा रजिस्टर नंबर १५७ / २०२२ भा. दं. वि. कलम ४५४,४५७,३८० ३४ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे आढळुन आल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन आरोपी रोहीत नानाभाऊ लंके रा-विश्रांतवाडी, पुणे व त्याचा साथीदाराचा शोध घेतला असता मिळुन आल्याने त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्यांच्याकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली दागिने गंठण, सोन्याची चैन, दोन अंगठया व चांदीचे पैजन १ जोड असे एकुण ७८ ग्रॅम वजनाचे ३,९०,०००/- रुपये (तीन लाख नव्वद हजार ) किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- १ पुणे डॉ. प्रियंका नारनवरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संतोष शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, गणेश दळवी, किशोर शिंदे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, मोहन दळवी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, गणेश आटोळे, सुमित खुट्टे, पंकज देशमुख, तुषार खडके, अजय शिंदे, अर्जुन कुडाळकर, शशीकांत ननावरे यांच्या पथकाने केली आहे.