प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक पुलगाव डिव्हिजन परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की, पंकज जयस्वाल रा. पुलगाव हा आपल्या घरी व दुकानात सुगंधीत तंबाखू बाळगूण त्याची विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच पोलिसांनी अन्नसुरक्षा अधिकारी, वर्धा यांना देवुन आरोपी पंकज रामलाल जयस्वाल, वय 34 वर्ष रा. राठी गल्ली, पुलगाव यांच्यावर सुगंधीत तंबाखू संबंधाने रेड केला असता त्यांनी सुगंधित तंबाखू व गुटखा आरोपी नामे इमरान जब्बर खान, वय ३६ वर्ष, रा. सुभाष नगर, पुलगाव यांचे सोबत त्यांचे चारचाकी वाहनाने आणल्याचे सांगितल्याने नमूद दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन १) वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधीत तंबाखू व गुटखा एकुण ३४.३५ किलो ग्राम किंमत ४१,९८३/- रुपये, २) एक हुंडाई एक्सेंट चार चाकी वाहन किंमत ३,५०,००० लाख रुपये असा एकुण ३,९१,९८३/- रुपये चा मद्देमाल जप्त करुन नमुद दोन्ही आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन पुलगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि उमाकांत राठोड, प्र. शि लोहार अन्न सुरक्षा अधिकारी,पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, विकास मुंडे,अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.