विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा.
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकी करिता होणा-या पार्श्वभुमीवर हिंगणघाट मतदार संघामध्ये पुर्वतयारी सुरु झालेली असुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आढावा घेतला.
हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या मतदान होणाऱ्या मतदान यंत्राची साठवणुक, त्याची सुरक्षा व त्या अनुषंगाने कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षाची व यंत्रणेचा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व तयारीचा आढावा उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन आज घेतला. सदर बैठकी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे, समुद्रपूरचे तहसीलदार कपील हटकर, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे व पोलीस निरीक्षक श्री गभणे इत्यादी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूकीकरीता निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करणे सुरु होणार आहे. त्यानुसार उपविभागीय कार्यालयामध्ये विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. सदर सर्व कक्षाना भेट देऊन जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. यावेळी राहुल कर्डिले यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
विधानसभा निवडणूकीसाठी मतदान करण्या करीता मतदार यांदीमध्ये नाव नोंदविण्याची मोहिम सुरु असुन अजुनही ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ नाही त्यांनी जवळच्या मतदान केंद्रावर किंवा तहसिल कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी करण्याचे आव्हान यावेळी केले.