आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे निवासी शहीद नितीन पुट्टेवार हे केंद्रीय राखीव पोलीस दल मध्ये 2000 ला नियुक्त झाले होते. दहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण प्राप्त करून. त्यांची पहिली तैनाती व्हीआयपी एरिया दिल्लीला झाली आणि आज ज्या दिवशी 18 ऑक्टोंबर 2001 रोजी ते वीरगतीला प्राप्त झाले.
देशासाठी आपला प्राणाची आहुती देणाऱ्या अशा विर शहीद नितीन पुट्टेवार यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या आठवणीत पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (तह) तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना भारत विद्यालंय स्थित स्मारका जवळ श्रद्धाजली वाहिन्यात आली.
श्रद्धाजली कार्यक्रमात पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तहसील के अध्यक्ष विलास भोयर, कोषध्यक्ष सागर दाते, सचिव राजू साटोने, संपर्क प्रमुख अमोल पवार, ग्रुप फाउंडर दिनेश नरड, अशोक खोडे, पांडुरंग धनविज, मधुकर उईके, गणपत वानखेडे, प्रणय कुमरे, हरीभाऊ ढाले, अक्षय पोटे, किशोर ढाले तसेंच शहरातील नागरिक उपस्थित होते.