Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आरपीआय आठवले गटाचा भाजपा युतीला जोरदार झटका, युतीचा प्रचार करणार नाही केले जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 23, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
आरपीआय आठवले गटाचा भाजपा युतीला जोरदार झटका, युतीचा प्रचार करणार नाही केले जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने महायुतीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या जागा वाटपात पक्षाला चर्चेत सहभागी करून घेतले नाही, एकही जागा अद्याप दिलेली नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे असे जाहीर केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) याला विधानसभा निवडणुकीत साधी दखल घेण्यात येत नसल्याने आरपीआय चे नेते नाराज आहे. त्यामुळे महा युतीचा प्रचार न करण्याचा पक्षाच्या राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये असा निर्णय झाला असून याची कल्पना पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र पदाधिकारी बाळासाहेब जानराव, सरचिटणीस अ‍ॅड. मंदार जोशी, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर तसेच अशोक कांबळे, संजय सोनवणे, महेंद्र कांबळे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, विरेन साठे यावेळी उपस्थित होते. जानराव यांनी सांगितले की सन 2014 पासून आरपीआय भाजपबरोबर आहे. आता महायुतीमध्येही आहे. लोकसभेला आम्ही जागा मागितली, तर एकही जागा दिली नाही. आता विधानसभेला पक्षाध्यक्ष रामदास आठवले 12 जागा मागत होते. त्यांना साधे चर्चेतसुद्धा सहभागी करून घेतलेले नाही, जागा वाटपाचा शब्दही भाजप किंवा महायुतीतील अन्य घटक पक्ष काढायला तयार नाहीत. या सगळ्याचा रोष पक्षात आहे. फक्त आठवले यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले व पक्षाला अन्य काही नाही दिले तरी चालते असा युतीचा समज झाला आहे. हा समज आम्ही काढून टाकू.

भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार मिळून बनलेल्या महायुतीच्या एकाही उमेदवाराच्या प्रचारात आरपीआय चा कार्यकर्ता सहभागी होणार नाही. आठवले यांना याची माहिती दिली आहे. 26 ऑक्टोबर ही मुदत आम्ही दिली आहे. तोपर्यंत आमची दखल घेतली नाही तर मंत्री आठवले त्यादिवशी त्यांचा अंतीम निर्णय जाहीर करतील अशी माहिती जानराव यांनी दिली. डॉ. धेंडे, अ‍ॅड. जोशी यांनी सांगितले की पक्षाची ही एकप्रकारे फसवणूकच सुरू आहे. कार्यकर्ते ती सहन करणार नाहीत. आरपीआयची प्रत्येक मतदारसंघात मोठी निर्णायक मतपेढी आहे. ती बाजूला राहिल्यास काय होऊ शकते याचा धडा युतीला बरोबर मिळेल.

Tags: आरपीआय आठवले गटाचा भाजपा युतीला जोरदार झटकायुतीचा प्रचार करणार नाही केले जाहीर.रामदास आठवलेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
Previous Post

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर.

Next Post

आम्ही भटके विमुक्त जमातीचे, कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आमच्या वस्तीत मतदान मागायला येऊ नये.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आम्ही भटके विमुक्त जमातीचे, कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आमच्या वस्तीत मतदान मागायला येऊ नये.

आम्ही भटके विमुक्त जमातीचे, कोणत्याही राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आमच्या वस्तीत मतदान मागायला येऊ नये.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In