युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या मतदारसंघातून कोण लढणार, याची सर्वांना मोठी उत्सुकता लागून होती. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर सुनील केदार यांच्या सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता शिगेला असताना सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
महाविकास आघाडी मध्ये काही जागेवर अजून वाद सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी अद्याप जाहीर व्हायची आहे. त्यामुळे उमेदवारांच्या नावांचीही घोषणा व्हायची आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुनील केदारांचे राजकीय वर्चस्व आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार त्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सुनील केदार यांना पुढील 5 वर्षे निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे सुनील केदार सावनेरमधून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात उमेदवार म्हणून अनुजा सुनील केदार यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी सावनेर तहसील कार्यालयात दाखल केला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला रिंगणात उतरवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत सावनेर विधानसभा मतदारसंघ सुनील केदार जो उमेदवार देतील तो असा निर्णय घेण्यात आला होता.
नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्यात केदारांची भूमिका महत्त्वाची आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असलेला हिंगणा विधानसभा मतदारसंघ सुनील केदारांनी काँग्रेससाठी मागितला होता. तो त्यांना देऊ केला असून त्या बदल्यात नागपूर शहरातील पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नेते चांगलेच चिडले आहेत. सुनील केदार यांनी ग्रामीणचे बघावे शहरात लुडबूड करू नये, असे त्यांचे म्हणणे आहे.