*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील उमेदवार भाग्यश्रीताई, हलगेकर यांनी नामांकन दाखल केले*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
आज अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार च्या उमेदवार भाग्यश्री ताई आत्राम, हलगेकर यांनी आपले नामांकन दाखल केले. इंडियन फंक्शन हॉल, भुजंगरावपेठा, अहेरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत आयोजित रॅलीला मोठ्या प्रमाणावर जनसमुदायाने प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये अहेरीतील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्यांना प्रचंड आशीर्वाद दिला.
भाग्यश्रीताई आत्राम यांनी या अद्भुत प्रेमासाठी आणि मिळालेल्या समर्थनासाठी जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे अहेरी समृद्धी, विकास, आणि आनंदाच्या नव्या वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. या बदलाच्या नव्या विचारांना त्यांनी सलाम केला आहे.