मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. त्यात हिंगणघाट विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांनी 21 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आता चार तारखेला उमेदवारी परत घेण्याची तारीख असून कोण कोण आपली उमेदवारी परत घेणार याची सर्व हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील नागरिकांना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात वर्षा देवेंद्र कन्नाके (बहुजन मुक्ती पार्टी) दोन अर्ज, प्रलय भाऊराव तेलंग (बहुजन समाज पार्टी) एक अर्ज, अनील आत्माराम जवादे (अपक्ष) दोन अर्ज, कोमल किशोर बावने (भारतीय जनसम्राट पार्टी) एक अर्ज, सुधीरचंद दौलतचंद कोठारी (अपक्ष) एक अर्ज, राजु उर्फ मोहन तिमांडे (अपक्ष) दोन अर्ज, अतुल नामदेवराव वांदिले (राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार) चार अर्ज, विठ्ठल राजेराम गुळघाने (अपक्ष) दोन अर्ज, कौशल खान जब्बार खान पठाण (अपक्ष) एक अर्ज, अनील महादेवराव मुन (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया- अ) एक अर्ज, सतीश लक्ष्मणराव चौधरी ( मनसे) दोन अर्ज, अश्विन श्रावण तावाडे (वंचित बहुजन आघाडी) एक अर्ज, संजय विठ्ठलराव राऊत (हिंद राष्ट्र संघ) एक अर्ज, दाखल केला. असे एकुण 13 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले.