मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाटचे अध्यक्ष, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७५ वर्षाचे होते. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. विद्या विकास संस्थेचे सचिव, माजी नगरसेवक डॉ उमेश तुळसकर तसेच डॉ. निलेश तुळसकर यांचे ते वडील आहेत.
सहा दिवसांपूर्वी पांडुरंग तुळसकर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज पहाटे त्यांची मृत्यूशी झुंज संपली व पहाटे दोन वाजताच्या सुमारास त्यांचे देहावसन झाले.
पांडुरंग तुळसकर यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य आहे. त्यांची समुद्रपूर व हिंगणघाट येथे शाळा, कॉन्व्हेंट, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय असून त्यांचा मोठा शैक्षणिक व्याप आहे. हिंगणघाट नगरपालिकेचे उपाध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविले होते. आज दुपारी बारा वाजता त्यांची तुकडोजी वार्ड येथील निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली यावेळी हजारोच्या संख्येने आप्तस्नेही व गणमान्य नागरिक सहभागी होते.
त्यांच्यावर वना नदीच्या तीरावरील स्मशानभूमीवर शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी आमदार समीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले, प्राचार्य डॉ. किशोरचंद्र रेवतकर, डॉ. राजू निखाडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.किरण वैद्य, प्रा. मेघश्याम ढाकरे आदी गणमान्य नागरिकांनी आयोजित शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.