*माजी मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांनी दुप्पटे टाकून पक्षात स्वागत केले*
*उमेदवारी नामांकन दाखलच्या दिवशी अनेकांचे पक्ष प्रवेश*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:*- महाराष्ट्र राज्याच्या विधान सभा सार्वत्रिक निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी राज्याचे माजी मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांनी उमेदवारी दाखल केले. त्यावेळी “ना भूतो… असा जनसागर होता. त्याच दिवशी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विविध पक्षाचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली स्वतःची उमेदवारी दाखल केल्यानंतर राजवाडा येथे घडी चिन्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुप्पटे टाकून स्वागत केले व सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिले.
यात प्रामुख्याने सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा येथील कृष्णा चुक्कावाऱ, पुरुषोत्तम कडार्ला, शिवराम जनगम, बंडू शंकर, राकेश कडार्ला, नागेश चुक्कावार, नागेश कोठारी आदी व अन्य गावातील असंख्यांचा पक्ष प्रवेशात समावेश आहे.
उल्लेखनीय म्हणजे दिड-दोन महिन्या आधी पासून राज्याचे माजी मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम हे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात जनसंवाद व आढावा बैठका घेऊन जनसंपर्क कायम ठेवले, जनसंवाद यात्रेत विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) प्रवेशाला आरंभ केले, उमेदवारी नामांकन भरून झाल्या नंतर लगेचच असंख्य कार्यकर्ते राजवाडा अहेरी येथे पक्ष प्रवेश केल्याने होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी जमेची बाजू झाली असून निवडणुकीचा मार्ग सोपस्कार झाल्याचे दिसून येत आहे.