मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं.
9420751809.
दि. ०४ नोव्हेंबर २०२४,
चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे भाजपा तालुका महामंत्री विनोदजी गौरकर यांच्या नव्या घराच्या वास्तुपूजनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. अशोकजी नेते यांनी गौरकर कुटुंबाला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पुष्पगुच्छ देऊन गौरकर यांच्या नूतन घराच्या वास्तुपूजनाचा आनंद व्यक्त करत नेते साहेबांनी गौरकर कुटुंबाचे अभिनंदन केले.
या प्रसंगी नेते साहेबांनी गौरकर यांच्या नव्या घराच्या सजावटीचे कौतुक केले आणि गावातील अडीअडचणींवर चर्चा केली. त्यांनी चर्चे दरम्यान म्हटले, “प्रत्येक व्यक्तीचे एक स्वप्न असते – एक छोटंसं, सुंदर घर असावं, ज्यामध्ये प्रेम, जिव्हाळा आणि नाती यांचे सौहार्द नांदावे. अशा घरात सुख-समृद्धी नांदावी.”
कार्यक्रमात भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, तालुका महामंत्री संजयजी खेडेकर, तालुका उपाध्यक्ष राजुभाऊ चौधरी, तसेच जेष्ठ नेते दुलाल मंडल, बंडूभाऊ नैताम, किसनजी कोसरे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी विनोदजी गौरकर आणि त्यांच्या पत्नी माजी उपसभापती सौ. वंदना ताई गौरकर यांचे अभिनंदन केले व त्यांच्या नव्या घराच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अशा सकारात्मक भेटींमुळे समाजातील एकतेची भावना वृद्धिंगत होत आहे आणि गावकऱ्यांमध्ये जवळीक वाढत आहे.