सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की चर्चेला उधाण… गमती जमती व कधी कधी उमेदवारांच्या विविध विषयांवर चर्चा. ही चर्चा कधी संपत्तीची, कधी कामांची तर कधी आश्वासनाची असते. बल्लारपूर मतदार संघ सद्या याला अपवाद ठरत आहे. येथे साधन संपत्तीची नाही तर उमेदवारांच्या एकूण स्वभावाची चर्चा केली जात आहे. एकाच राशीच्या 2 व्यक्ती भिन्न कशा असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
बल्लारपूर मतदार संघाची निवडणूक रंगतदार होत आहे. तिहेरी लढतीमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. लोकसभेत बल्लारपूर मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार यांना तब्बल 45 हजार मतांचा फटका बसल्यांने, या निवडणूकीत कॉंग्रेसचे पारडे जड राहील. ताईच्या बंडखोरीमूळे कॉंग्रेस – भाजपात तुल्यबळ लढत होईल असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.
त्यात सुधीर मुनगंटीवार हे या मतदार संघातून चौथ्यांदा त्यांच्या स्वभावगुणांमुळे विजयी होणार असे मानणारा एक मोठा वर्ग असल्याने मतदार संघात उमेदवारांच्या स्वभावावर चर्चा केली जात आहे. दिसून येत आहे. पण कॉंग्रेस आघाडीकडून मूलचे व्यवसायाने कंत्राटदार असलेले मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीकडून विद्यमान आमदार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात आहेत. दोनही उमेदवारांची राजकीय सुरूवात भाजपातूनच झाली. मुनगंटीवार हे भाजपातच आहेत, मात्र संतोष रावत यांचा तत्कालीन मंत्री श्रीमती शोभाताई फडणवीस यांचेसोबत वाद झाल्यांने ते कॉंग्रेसवासी झालेत. एकाच पक्षात वाढलेले हे दोनही नेत्यांचा पक्ष आणि त्यांची रासही एकच सुधीर आणि संतोष एकच आहेत. मात्र दोघांचे स्वभावात कमालीचे अंतर असल्यांचे मतदारात चर्चा आहे.