आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा ४६ मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नामदेवराव वांदिले यांच्या प्रचारार्थ आज गिरड येथे जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला युवासेना विभागीय सचिव प्रसिध्द वक्ते कु.अपूर्वा पिट्टलवार, ओबिसी नेते ईश्वरजी बाळबुधे, लोकजागरचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी ज्ञानेश्वरजी वाकुडकर, शेतकरी नेते सुदामजी पवार, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष आशिष पांडे यांची उपस्थिती होते.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील सर्व समस्या सोडवण्यासाठी तसेच मतदारसंघाच्या सर्वांगीण व सर्वसमावेशक विकासासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून अतुल नामदेवराव वांदिले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन उपस्थितांनी केले. या सभेला गिरड सर्कल मधिल महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व गिरड सर्कल मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.