मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली जिल्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यात पर्लकोटा नदीजवळ
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या विश्वसनिय गोपनिय माहितीच्या आधारे सदर स्फोटकांचा शोध घेऊन ते निकामी करणेकामी गडचिरोलीहून एक (BDDS)बीडीडीएस टीम हेलिकॉप्टरने घटनास्थळी पाठविण्यात आली. गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ कंपनी आणि बीएसएफ कंपनीच्या एकत्रित पथकाने सदर परिसरात शोध अभियान सुरू केले.शोध अभियाना दरम्यान पथकांना भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED)सापडले. बीडीडीएस पथक स्फोटके निष्क्रिय करण्याची तयारी करत असताना एका स्फोटकाचा (IED)स्फोट झाला, तर दुसरे स्फोटक (IED) बीडीडीएस पथकाने घटनास्थ्ळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट केला.
सुरक्षा दलातील कोणत्याही जवानाला दुखापत झालेली नाही, तसेच सदर परिसरात अजून शोध अभियान सुरू आहे. गडचिरोली पोलीसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांचा आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे