राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल वांदिले यांना दिला जाहीर पाठिंबा.
अनिल, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि केंद्रित मंत्री रामदास आठवले यांना राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत एका पाठोपाठ झटके बसत आहे. त्यात पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांच्या धोरण वर प्रश्न चिन्ह निर्माण करत पदाचे राजीनामे दिले. त्यात आता परत एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निष्ठावान सदस्य व वर्धा जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ मेंढे यांनी राजीनामा दिला त्यामुळे रामदास आठवले यांना जोरदार झटका बसला आहे.
यावेळी रामभाऊ मेंढे म्हणाले की, आजच्या राजकिय परीस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे केन्द्रीय मंत्री व आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना कार्यकर्ताचा स्वाभिमान तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या मुल्यांची जाणीव राहली नसून केवळ रिपाई आठवले पक्ष स्वःहिता पलिकडे त्यांनी पक्ष कार्यकर्ताना महायुतीच्या नावाने आज भाजपाच्या दावणीला बांधले असून महाराष्ट्र, झारखंड विधानसभेच्या निवडणूकीत एकही मतदार संघात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाला जागा दिली नाही.
ते पुढे बोलताना म्हणाले की, केवळ स्वःताच्या हितासाठी रामदास आठवले याना केन्द्रीय मंत्री पद उपभोगाची असून ते भाजपाचे बाहुले झाले आहे. आठवले यांना महाराष्ट्रतील व केन्द्रातील भाजपा नेतृत्व विचारत नसून ‘ना घर का, ना घाट का” हि स्थिती आहे. त्यांनी स्वतः हे मान्य केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने मला देश फिरायला मिळते हे निंदनीय व्यक्तव्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला, विचाराला तथा संविधानाला तिलांजली देणारे आठवले यांचे मत ठरत आहे.
अश्या विचाराचे पक्ष नेतृत्व तसेच भाजपाच्या निती निर्णया विरोधात मी आपला जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाने त्या जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद याचे वर उठून कार्य करणाऱ्या राजकिय व्यक्तिना या विधानसभा निवडणूकीत सहकार्य करण्याचे ठरविले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपाचे ध्येयधोरणा विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदीले यांना स्वःता व सहकारी वर्गाचा पाठींबा जाहिर केला आहे.