अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर हिंगणघाट येथे हिंगणघाट पोलीस स्टेशन पथकाच्या वतीने अवैध धंद्यावर व दारुबंदी विरोधात धडक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, हिंगणघाट यांचा पथकाला हिंगणघाट परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराचे खबरेवरुन खात्रीशिर माहीती मिळाली की, एक महीला शिवानी डेकाटे, रा संत चोखोबा वॉर्ड, हिंगणघाट हि कथीया रंगाचे डेस्टीने मोपेड गाडीने शहालंगडी रोड कडुन संत चोखोबा वार्ड हिंगणघाट कडे गावठी मोहा दारु व देशी दारु मालाची वाहतुक करित आहे अशी माहिती मिळाली.
खात्रीशिर माहीतीवरुन उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालयातील पथकाने सदर ठिकानी जावुन नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे एक महीला कथीया रंगाचे डेस्टीने मोपेड गाडी क्र. एम एच 32 ए एन 9827 ने येतांना दिसली तिला पंच व पो स्टाफचे मदतीने थांबवुन माहिती घेतली असता तिने आपले नांव सांगितले. तिच्या मोपेड गाडीची तपासणी केली असता पायदानावर ठेवून असलेल्या दोन थैल्यांची तसेच गाडीचे शिट खालील डिक्कीची पाहनी केली असता त्यामध्ये गावठी मोहा दारुने दोन शेंदरी रंगा च्या पिशव्या मध्ये एक लिटर च्या एकुण 25 प्लास्टीक बाँटल मध्ये एकुण 25 लिटर गावठी मोहा दारु किं. 5000 रुपये व गाडीचे डिक्कीत प्लास्टीक पन्नीमध्ये देशी दारुने भरुन असलेल्या प्रिमीयम नंबर –1 कंपनिच्या 90 एम एल च्या 50 शिशा किंमत 5000/-रु. व एक कथीया रंगाची हिरो डेस्टीनी मोपेड गाडी क्रंमांक एम एच 32 ए एन 9827 किंमत 95,000/-रु. असा एकुण जु.किं.1,05,050/- रु.चा माल मिळुन आल्याने सदर महिला आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन, हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधीकारी हिंगणघाट यांचे निर्देशा प्रमाणे पो.हवा. नरेंद्र डहाके, अश्वीन सुखदेवे, पोहवा उमा कचाटे, पो.शि आकाश कांबळे, राकेश ईतवारे यांनी केली.

