अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथील अशोक जवादे यांचे निवासस्थानी आज दुपारी १.३० वाजताचे सुमारास आग लागून घरातील सर्व साहित्य आगीचे भक्षस्थानी पडले.
प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे दिसून येत असून यात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आग लागल्याचे निदर्शनास येताच कुटुंबीयांनी अग्नीशमन दलाला पाचारण केले.
स्थानीक कृषी उत्पन्न बाजार समितीची अग्नीशमन विभागाची चमू प्रथम घटनास्थळी पोचली, यानंतर नगरपालिका अग्निशमन सेवेचे वाहनही घटनास्थळी पोहचले व आग नियंत्रणात आणली.
आगीत घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, आंथरून फर्निचर, फ्रिज, एअर कंडीशनर भस्मसात झाले असून लाखोची वित्तहानी झाली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.