राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- काल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले. अहेरी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या राजाराम खांदला मतदान केंद्रवर प्रत्येक निवडणुकीच्या तुलनेत बघितले तर या निवडणुकीत मतदानात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला असुन सर्वाना आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडुन देऊन विधानसभेत आपल्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवण्यास सज्ज झाले असुन वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या कुतुहलाने आपल्या उमेदवारांसाठी हवे असलेल्या जबाबदारी पार पाडताना दिसले.
या पुर्वी अनेक निवडणुकीत अनेक मतदार काही कारणास्त मतदानाचा हक्क बजावण्यापासुन वंचित राहत होते कधी कोणाचे नाव च नाही तर कधी कोण्या मतदाराला वेगवेगळ्या अडचणी मुळे मतदान करता येत नव्हते परंतु निवडणुक विभागाने मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहु नये म्हणुन अनेक प्रकारच्या उपाय योजना काढल्यामुळे आता मतदार सर्व आपले कर्तव्य बजावत आहेत.
गुड्डीगुडम मतदान केंद्रावर एकूण स्त्री. ३४७ व पुरुष. ४३४ एकूण टक्केवारी ९०. ०७
गोलाकर्जी मतदान केंद्रावर एकूण स्त्री – २५३ व पुरुष – २७१ एकूण संख्या ५२४ एकूण टक्केवारी ८४.७८
राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत एकूण स्त्री – ३१०व पुरुष – ३२६ एकूण संख्या ६३६ ग्रामपंचायत पंचायत राजाराम कार्यालयात एकूण स्त्री – ३०० व पुरुष – ३४२ एकूण ६४२ आणि खांदला ग्रामपंचायती मध्ये एकूण स्त्री – ३९४व पुरुष – ४७० इतके मतदान करण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात शांततेत निवडणूक पार पडली आहे.
उमेदवाराचे भाग्य ईव्हींएम मध्ये बंद. अहेरी विधानसभा मतदार संघात मतदान शांततेत पार पडले आणि सर्वच उमेदवाराचे भाग्य ईव्हींएम मशीन मध्ये बंद झाले आहे. कोण विजय होणार त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ते 23 नोव्हेंबरला समोर येणार आहे.
