मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणी ला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समिर कुणावर यांना 5051 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाचे उमेदवार अतुल वांदीले यांना 2748 मते मिळाली आहे. ते 2303 मताने पिछाडीवर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अश्विन तावाडे असून त्यांना पहिल्या फेरीत 42 मते मिळाली. अपक्ष उमेश वावरे यांना 41 मते, अपक्ष राजू तीमादे यांना 32 मते, बसपा प्रलय तेलंग यांना 31 मते, अपक्ष विठ्ठल गूळघाने यांना 10 मते मिळाली आहे.

