युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उमरेड:- काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाले, त्यात भाजपा प्रणित महायुतीने विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत प्राप्त करून महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपा प्रणित महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले.
नागपुर ग्रामीण मधील उमरेड विधानसभा मतदार संघात काँग्रेस विरुद्ध भाजपा मध्ये जोरदार सामना बघायला मिळाला. उमरेड मतदारसंघात काँग्रेसने संजय मेश्राम तर भाजपने सुधीर पारवे यांना उमेदवारी दिली होती. यांच्यात थेट लढत होणार, असा अंदाज असताना भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे हे अचानक मैदानात उतरले त्यामुळे उमरेड विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत रंगली. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरेड या मतदारसंघात आजवर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होत आले आहे. मात्र, यंदा भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांच्या मतांवर हात घातला व काँग्रेसचे संजय मेश्राम 85,372 मते मिळवत विजयी झाले आहे.
उमरेड विधानसभेत काँग्रेसचा विजय
संजय मेश्राम (काँग्रेस) – विजयी
मिळालेली मते – 85,372
मतदान -39.54 टक्के
सुधीर पारवे (भाजप) – पराभूत
मिळालेली मते 72,547
मतदान- 33.60 टक्के