देश सुरळीतपणे चालविण्याची मार्गदर्शक पुस्तिका म्हणजे संविधान: पवण लोहकरे
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- देशाच्या कारभार संबधिच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसुत्रपणे ज्या ग्रंथात नमुद केले किवा देश सुरळीतपणे चालविण्याची मार्गदर्शक पुस्तिका म्हणजे संविधान असे मत भारत विद्यालयाचे संगित शिक्षक पवन लोहकरे यानी व्यक्त केले. हिगंणघाट येथील भारत माध्य. व उच्च माध्यमिक विघालयात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर उपमुख्याध्यापक उपमुख्याध्यापक हरिष भट्टड, पर्यवेक्षक विनोद नांदूरकर, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरीले, पवन लोहकरे, किशोर चवरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पवन लोहकरे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही शिकवण आम्हाला संविधान देते. भारतात विविध भाषा, जाती- धर्म असतानाही यासर्व विविधतेला एकतेमध्ये गुंफून राष्ट्रीय एकता साधण्याची किमया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी भारतीय सविधानाव्दारे केली आहे. भारतीय संविधानाने जी मुल्ये दिली आहेत, ती भारतालाच नव्हेतर, संपुर्ण जगाला मार्गदर्शक आहे. यावेळी किशोर चवरे यानी सुध्दा आपले विचार व्यक्त केले. तसेच 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यानी भाषण व संविधानावर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्ग 8 वी ची विद्याथीनी अर्पिता हिवराळे हिने केले.

