युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन काटोल:- भारतीय संविधान दिनानिमित्त आज काटोल येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकाजवळ बहुजन वंचित क्रांती सेना नागपुर जिल्हा शाखा काटोलच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापण बहुजन वंचित क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन बहुजन वंचित क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन वंचित क्रांति सेनेचे ज्येष्ठ नेते जानराव गावंडे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा. विरेंद्र इंगळे, बहुजन वंचित क्रांती सेनेचे काटोल तालुका अध्यक्ष विजय डहाट, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशराव धोटे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश देशभ्रतार, संघटनेचे नरखेड तालुका अध्यक्ष सुनिल नारणवरे, संघपाल बागडे, युवा कार्यकर्ते हर्षद बनसोड, ज्येष्ठ कार्यकर्त्या चंद्रकला वानखेडे, देविदास घायवट हे होते. यावेळेस बळवंत नारणवरे, नानाजी तायवाडे, श्रीधर सोमकुवर, प्रकाश देशभ्रतार, सुरेश देशभ्रतार, शीलदास वाहने, नामदेव रक्षित, अर्जुन शेंडे, विजय डाहाट, सुनिल नारणवरे, हर्षद बनसोड, माणिक गोलाईत, निळकंठ गजभिये, जानराव गावंडे यांनी संविधाना विषयी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मुख्य मार्गदर्शन करताना दिगांबर डोंगरे म्हणाले की, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नव्हते ज्यांचा छळ पिळवणूक अत्याचार करुण जिवन जगण्याचे अधिकार ज्या संस्कृतीने नाकारले त्या संस्कृतीच्या विरोधात अतोनात संघर्ष करुण आपल्या विद्वत्तेचा जोरावर त्या जुल्मी विचारसरणीवर मात करून जगातील सर्वोत्तम भारतीय संविधान लिहून भारतातील प्रत्येक मनुष्याला स्वाभिमानाचे जिवन बहाल केले व देशात लोकशाही प्रस्थापित करून वण म्यान वण व्होट वण व्ह्यालु अशा सूत्रानुसार समानता निर्माण करून सर्व जाती धर्म पंताच्या लोकांना संविधानाच्या माध्यमाद्वारा एकसंघ ठेवण्याचे पवित्र कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले असे दिगांबर डोंगरे म्हणाले.
या कार्यक्रमाचे संचालन बहुजन वंचित क्रांती सेनेचे पारडसिंगा जी प सर्कल चे अध्यक्ष निळकंठ गजभिये यांनी केले तर आभार बाबाराव तागडे यानी मानले. यावेळेस शेखर बोरकर, दिगांबर भगत, तुकाराम देशभ्रतार, प्रकाश देशभ्रतार (वाघोडा), दिनेश बोरकर, विनायक वाघमारे, गुलाबराव तागडे, वंदना बागडे, रोषण भगत, बालू घोरपडे, रमेश धुर्वे, युवराज तागडे, भीमराव मनोहर, अंबादास बागडे, नरेश रक्षित, शोभा सोनुले, यश डहाट, प्रज्ञा डोंगरे, कविता गजभिये, दिलीप लांजेवार, शंकर काळभांडे, कृष्णाजी ढोके, वामनराव सोनटक्के, प्रकाश नीस्वादे, गौतम फुले, भीमराव गौरखेडे, संभाजी सोनुले यांच्यासह मोठ्या प्रमाणात बहुजन वंचित क्रांति सेनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.