अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- देशातील समाज सुधारकांच्या श्रेणीतील अग्रेणी समाज सुधारक, भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. देशात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त हिंगणघाट येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना श्रंद्धाजली वाहण्यात आली.
हिंगणघाट शहरातील नंदोरी चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. नंदोरी चौकात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगरसेवक अनिल भोंगडे यांनी भूषविले. यावेळी संतोष तीमांडे, माजी उपसरपंच बुरकोनी कृष्णा मुंगले, माजी सैनिक अमित कांबळे, श्रीकांत जंगले, जिला अध्यक्ष म फुले समता परिषद कविता मुंगले, माधव देशमुख, जयंत सानवर, पत्रकार अनिल कडू इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या कार्यक्रमात व्यक्तानी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन किशोर तितरे तर आभार अनिल कडू यांनी मानले.
महात्मा फुले यांनी सर्व समाजाच्या महिलान साठी शिक्षणाचा पाया रचून स्त्री शिक्षणाच्या क्रांतीची ज्योत आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने पेटवली. यावेळी महिला आणि खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून महात्मा फुले यांची ओळख आहे. असे उदगार यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.