पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर
दिनांक २४/०९/२०२२ रोजी कासेवाडी पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार तेजस पांडे तसेच तपास पथकातील अधिकारी पोलीस अमलदार संदीप तळेकर, विशाल ખાધવ છે ૬૬ પોનીત હાથે રીત સાગામી નવરાત્રી તાવાને અનુષાને પેટ્રાનિમરત અસત્તાના સોનિ नाईक यांना त्यांचे गुप्त बातमीदारा व्दारे बातमी मिळाली की, खडक पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक, वय २६ वर्षे, रा. ५४ / बीपी / लोहीयानगर, पुणे सध्या, कात्रज कोंढवा बायपास रोड, निंबाळकर वस्ती, प्रकाश कदम यांचे बंगल्याजवळ, पुणे हयाचे कंबरेला एक पिस्टल असुन तो नेहरू रोडवर सोनवणे हॉस्पीटल शेजारील बसस्टॉप जवळ थांबलेला आहे. सदरची बातमी वरिष्त पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव खडक पोलीस स्टेशन पुणे शहर यांना सांगितली त्यांनी योग्य ती काळजी घेवून बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
सुचनेप्रमाणे सपोनि नाईक व सोबतचे स्टाफचे मदतीने नेहरू रोडवर, सोनवणे हॉस्पीटल शेजारील बसस्टॉप जवळ जावून खात्री करता रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक हा पोलीसांना दिसुन आल्याने त्यास झडप घालून पकडण्यात आले. यास पुर्ण नाव/पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ऋषीकेश ऊर्फ सोन्या संदिप मंडलिक, वय- २६ वर्षे, रा. ५४ / बीपी / लोहीयानगर, पुणे सध्या, कात्रज कोंढवा बायपास रोड, निंबाळकर वस्ती, प्रकाश कदम यांचे बंगल्याजवळ, पुणे असे सांगितले, त्याची अंगझडती घेता त्याचे कंबरेस मागील बाजुस ६०,०००/- रुपये, एक देशी बनावटीचे लोखंडी स्टील बॉडी असलेले पिस्टल, मॅगझीनसह व ५,०००/- रु किं चे ०५ जिवंत काडतुसे मिळुन आले असुन त्याचेवर पोलीस अंमलदार तेजस पांडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास नितीनकुमार नाईक, सहा पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
नमुद सर्व कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह-आयुका, श्री. संदीप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. राजेंद्र डहाळे, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ डॉ. प्रियंका नारनवरे, व मा. सहा पोलीस आयुका फरासखाना विभाग श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. राजेश तटकरे, सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहा पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस अंमलदार तेजस पांडे, संदिप तळेकर, विशाल जाधव यांचे पथकाने केली आहे.