पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर
दि. ०४/०९/२०२२ रोजी सकाळी टस्कन सोसायटीचे उत्तरेकडील मेन गेट समोर, चौधरीनस्ती, खराडी, पुणे येथे एक इसम वॉकिंग करत मोबाईलवर बोलत असताना तीन अनोळखी इसमांनी मो. सायकल वर येवुन त्यांचे हातावर कोयत्याने वार करून त्यांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. सदर बाबत वंदननगर पो.स्टे. येथे गु. रजि. नं. ३२१/२०२२ भादवि कलम ३९४,३९७.३४ अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाच तपास बालु असताना पोलीस अंमलदार जाधव चंदननगर पोलीस स्टेशन, यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत खबर मिळाली की तीन अनोळखी इसम हे खराड़ी जॅकवेल ब्रिज, खराडी येथे पोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना देवुन वरिष्ठानी माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावून खात्री करून योग्यती कार्यवाही करणे बाबत आदेश दिले.
पोलीस अम. जाधव व स्टाफ असे सदर ठिकाणी रवाना झाले. ते खराबी जॅकवेल येथे पोहचले असता प्राप्त माहिती प्रमाणे खराडी जॅकवेल जवळ भिंती लगत तीन संशयीत इसम है संशयीत रित्या एका दुचाकीजवळ उ असल्याचे दिसले. प्राप्त माहिती प्रमाणे सदर इसम दिसल्याने व त्यांनी पोलीसांना पाहताच ते पळून जाण्याच्या स्थितीत असताना परील स्टाफने त्यांचा पाठलाग करून शिताफिने पकडुन त्यांच्या ताब्यात असलेल्या मोबाईल व दुचाकी बाबत त्यांचेकडे विचारपुस करता ते असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १. विनायक राजु अहिवळे, वय २१ वर्षे, रा. ताडिगुत्ता, किर्तनेबाग धायरकर वस्ती, मुळचा पुणे, २. वैभव शैलेश गायकवाड, वय-२२ वर्षे, रा. गायरान वरती, केशवनगर, मुंढवा, पुणे ३. अदित्य नितीन बटप, वय २१ वर्षे, रा.सापरस लाईन बाजार इस्ट, खडकी, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना पोलीस ठाणे येथे आणुन त्याना विश्वासात घेऊन त्यांचे ताब्यात असलेल्या स्प्लेंडर मो.सा. बाबत तपास केला असता त्यांनी गितले की, पंधरा ते वीरा दिवसापुर्वी त्यांनी खराडी भागात एका वयस्कर इसमाकडुन जबरदस्तीने मोबाईल हिस्कावुन घेत असताना, सदर इसमाने त्यांचे मधील एकारा पकडुन ठेवले होते. सदर वयस्कर इराम पकडलेल्या साथीदारास सोडत नसलेने वयस्कर इसमाचे हातावर कोयता मारुन त्याचे साथीदारांची सुटका करुन त्यांचा मोबाईल हिसकावून चोरून नेला होता. वरील नमुद इसमांनी चंदननगर पोलीस स्टेशन गुरजि. नं. ३२१/२०२२ हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्ह्यातील मोबाईल व दुचाकी असा ६०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई हि श्री नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री रोहीदास पवार पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-४, पुणे शहर, श्री किशोर जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे, श्री रविंद्र कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे). चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे दिमतीत पोलीस अंमलदार बापू भुजबळ, महेश नाणेकर, सुरज जाधव, श्रीकांत कोद्रे, सुभाष आव्हाड, शेखर शिंदे, गणेश हांलगर, गणेश आव्हाने ज्यांनी केलेली आहे.

