प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाइन हिंगणघाट:- दिनांक 4 डिसेंबर 2024, बुधवार रोजी साई मंदिर हॉल, नंदोरी रोड हिंगणघाट येथे राज्यात नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाचे उमेदार अतुल वांदिले यांची आभार बैठक संपन्न झाली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून जनतेने अतुल वांदिले यांना मतरुपी आशिर्वाद दिल्याबद्दल त्यांनी संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानले. त्याच बरोबर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निवडणुकीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले, रात्रीचा दिवस केला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे झटणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी, जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे’ अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. याप्रसंगी हिंगणघाट विधानसभेतील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.