*शासकीय योजनेचे लाभ मिळ वून देतो असे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी व परिसरातील जनतेस पोलीस स्टेशन अहेरी तर्फे आवाहन करण्यात येत आहे की, मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत. तरी अनोळखी क्रमांकावरून बोलणारी व्यक्ती आपल्या मोबाईल वरील OTP मागत असेल तर कृपया कोणीही OTP सांगू नये. आपण OTP किंवा आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तीस सांगितल्यास आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपण सतर्क रहा व इतरांना सतर्क करा व फसवणूक होण्यापासून सुरक्षित रहा, असे आवाहन
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन अहेरी कडून करण्यात आले आहे. व असे प्रकार घडल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावे. सदैव आपल्या सेवेत. पोलीस स्टेशन अहेरी.